नवीन बातमी :वसंतदादा शुगर इन्सि्ट्युट पुणे यांचेकडून सन 2021-22 चा डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सह. सा. कारखान्यास कै. वसंतदादा पाटील सर्वेात्कृष्ट साखर कारखाना राज्य पातळीवरील पुरस्कार व कै. कर्मयोगी शंकररावजी पाटील सर्वेात्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार तसेच ऊस भूषण शेतकरी दक्षिण विभाग पुर्व हंगामात पहिला पुरस्कार जाहिर.







संक्षिप्त इतिहास

              मा. नामदार. डॉ. पतंगरावजी श्रीपतराव कदम यांच्या ग्रामीण भागातील गरीब जनतेशी आला व कडेगावव खानापूर तालुक्यातील दुशाकली भागातील परिवर्तनाचे नियोजन करण्याचे सन १९७१ पासून निश्चित केले. त्यांनी परिस्थितील बदल केला व हजारो लोकांना मागदर्शन केले. सामाजिक व आर्थिल बदल करण्याकरिता गेले ३० वर्ष अठक पर्यंत केले आहेत. सोनहिरा सहकारी साखर कारखाना हा शेती व आद्योगिकरणास चालना देणारा मह्व्याचा असून त्याची संकल्पना मा. नामदार. डॉ. पतंगरावजी कदम यांच्या मनात साकारली सोनहिरा सहकारी साखर कारखाना हा ग्रामीण भागातील जनतेला कल्पतरूसारखा इच्च्या पूर्ण करणारा वाटत आहे. मा. नामदार. डॉ. पतंगरावजी कदम साहेब यांनी विविध एकमेकांवर आधारित सयुक्तिक उपक्रम ओळखले. त्यामध्ये मोलॉसीस पासून स्पिरीट व केमिकल तयार करणे. बॉगवर आधारित सह वीज निर्मिती प्रकल्पाची उभारणी करणे, उस विकास व संशोधन कार्यक्रम, शेतकर्यांना आवश्यक ती माहिती उपलब्ध करून देणे याचा समावेश आहे.

सोनिया गांधी यांच्या शुभ हस्ते सोनहिरा सहकारी कारखान्याचे उदघाटन झाले.

          मा. नामदार. डॉ. पतंगरावजी कदमसाहेब, वनमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांच्या अथक प्रयत्नाने सोनहिरा सहकारी साखर कारखान्याची उभारणी होवून मा. ना. विलासरावजी देशमुख, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मा. श्री. मोतीलालजी व्होरा, मा. श्री. गोविंदरावजी आदिक या प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत दिनांक २२ एप्रील, २००० या शुभदिनी नवीन साखर कारखान्याचा उदघाटन सोहळा व भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला आणि १९९९ - २००० मध्ये कारखान्याची चाचणी उस गळीत हंगाम यशस्वीपणे घेवून २००० - २००१ ते २००९-२०१० अखेर एकून दहा उस गळीत हंगाम घेण्यात आलेले आहेत. क्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडे क्र. एसएन/के एचआर/ पीआरजी(ए) एस - ४६ दिनांक २५ मार्च, १९९४ अन्वये नोंदणी झालेली आहे. सुरवातीस खानापूर तालुक्यातील ६०गव.चा कार्यक्षेत्रात समावेश होता. सध्या कारखान्याचे कार्यक्षेत्र तीन तालुक्यात विस्तारललेले असून त्यामध्ये कडेगाव तालुक्यातील ५६ आणि खानापूर तालुक्यातील ११ व पलूस तालुक्यातील ३१ अशा एकून ९८ प्रकल्प साईटला मान्यता दिलेली असून उभारणीसाठी एकून २८६ एकर जमीन खरेदी करण्यात आली आहे.

          कारखाना व इतर इमारतीच्या प्लान एस्टीमेट्चे काम मे. बेरी अर्किटेक्टस ऑड इं जिनीअर्स प्रा. ली., कोल्हापूर यांचेकडून करून घेण्यात आले असून कारखाना इमारतिची उभारणी नाविन्यपूर्ण पध्यतिने करण्यात आली. सिव्हील बांधकामे दोन टप्यात पूर्ण करण्यात आली. कारखाना इमारत बांधकाम, मशिनरी फौंडेशन, आर. सी. सी. चिमणी व कारखाना पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच साखर साठवणुकीसाठी सहा गोडावून बांधली असून कामगांराना राहनेसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या एकून ८७ सदनिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. कारखान्याकडे येणाऱ्या पाहुण्याकरिता सुसज्ज अतिथीगृह इमारत देखील बांधली आहे. कारखाना मशिनरी पुरवठा व उभारणी मे. वालचंदनगर इंडस्ट्रीज, पुणे यांनी केली असून या कामाचे सुपरव्हिजन नॉशनल फेडेशन ऑफ को. - ऑपरेटीव्ह शुगर फ्याक्टीज ली., नवी दिल्ही यांनी केले आहे.

          प्रकल्प उभारणीसाठी एकून खर्च रक्कम रुपये ४८ कोटी झालेली आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या अधिपत्याखाली सहभाग योजने अंतर्गत इतर बँकानी रक्कम रुपये २८.८० कोटी मध्यम / दीर्घ मुदत कर्ज उपलब्ध करून दिले आहे. कारखान्याकडे अभासादांचे भाग भांडवल रक्कम ७.०७ कोटी जमा असून महाराष्ट्र शासनाकडून भाग भांडवल म्हणून रक्कम रु. १४.४० कोटी मिळालेले आहे.

          मशिनरी उभारणी शुभारंभ दि. ८ जानेवारी, १९९९ रोजी मा. ना. डॉ. पतंगरावजी कदमसाहेब यांच्या शुभहस्ते आणि मा. नागनाथ अण्णा नायकवडी, संस्थापक, हुत्तात्मा किसान अहिर सहकारी साखर कारखाना आणि मा. मदनरावजी मोहिते, तत्कालीन चेअरमण, कृष्णा सहकारी साखर कारखाना यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. एका वर्षात मशिनरी उभारणी पूर्ण केली

          महाराष्ट्रचे थोर विचारवंत मा. श्री. यशवंतरावजी मोहिते याच्या शुभहस्ते कारखान्याच्या चाचणी गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.

चाचणी गळीत हंगाम शुभारंभ शुभहस्ते मा. यशवंतरावजी मोहिते ( भाऊ )

          प्रत्यक्षात कारखाना उभारणी २५ मार्च १९९४ साली मान्यता मिळाली व उभारणी करारनामा १२ जून १९९५ ला. झाला परंतु युक्ती शासन सत्तेवर आले असलेले भागभांडवल मिळवनेस खूप अडचणी आल्या. त्यामुळे कारखाना उभारणीस उशीर झाला. कारखाना उभारणी हि ताकारी व टेंभू योजना गृहीत धरून केलेली होती. परंतु ताकारी व टेंभू योजनेची वेळेत न झाल्यामुळे कार्यक्षेत्रात पुरेसा उस उपलब्ध होऊ शकला नाही. तसेच सं २००३-२००४ मध्ये महाराष्ट्रात भयावह दुष्काळ पडलेला होता तसेच लोहारी मावा. इ. कारणामुळे अपेक्षित गाळप होवू शकले नाही. कार्यक्षेत्रा बाहेरून मिळेल तो उस आणावा लागला. अश्या अनेक अडचणीवर मात करीत काटकसरीने कारखाना चालविलेला आहे.

          कार्यक्षेत्रात उस उपलब्धतेच्या दृष्टीने शासनाकडून कारखान्यामार्फत ताकारी उपसा सिंचन योजने अंतर्गत पोटकालवे खुदाईकरिता २५ मी २००४ ला मंजुरी मिळाली व कारखान्याची सुरवातीस रक्कम गुंतवून पोटकालवे खुदाई केली. सदर रक्कम शासनाकडून नंतर मिळाली. सदर पोटकालवे खुदाईमुळे कार्यक्षेत्रात उस उत्पादनात वाढ झालेली आहे व पुरेसा उस उपलब्ध झालेला आहे. कार्यक्षेत्रात पुरेशा उस उपलब्ध झाल्यामुळे ३०००० लिटर्स क्षमतेचा आसवनी प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला व २२ मे. व्याट झाम्तेच्या को-जनरेशन प्रकल्पाची मदत करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केलेला आहे.

जनावरांसाठी चार छावन्या -

          सोनहिरा सहकारी साखर कारखान्याने सं २००३-२००४ मध्ये कडेगाव ब खानपूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडल्याने शेतकऱ्यांची जनावरे ( गाई, म्हशी, बेलं ) इ. वाचविण्यासाठी ११ ठिकाणी जनावरांच्या छावन्या सुरु केल्या व तेथील जनावरांना हिरवे गवत, उस कडबा पेंड, पाणी इ. पुरवठा केला. सदर चारा छावण्यात एकून ११००० जनावरांना आश्रय देण्यात आला होता.
हे संकेतस्थळ इंटरनेट एक्ष्प्लोरर ८.० किव्हा अधिक वर १०२४ * ७६८ या रीझोल्युशन ला उत्तम दिसेल
सर्व अधिकार आरक्षित © 2011. सोनहिरा साखर कारखाना   संदेश संकेतस्थळ कर्ता : ३डी सर्विसेस | व्यवस्थापन | तपासा ई-मेल